

Beed News
esakal
यवतमाळ: वर्धा येथून नांदेडकडे जात असलेल्या मिनी ट्रॅव्हल्सला यवतमाळ शहराजवळील भारी विमानतळ परिसराजवळ अचानक आग लागल्याची घटना शनिवारी (ता. २१) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. अवघ्या काही वेळातच संपूर्ण मिनीबस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून पूर्णतः जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही.