esakal | Wari 2019 : नामदेव महाराजांच्या पालखीचे गोल रिंगण
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली - येथे तालुक्‍यातील नरसी येथील संत नामदेव महाराज पालखीचे रविवारी पहिले गोल रिंगण झाले.

Wari 2019 : नामदेव महाराजांच्या पालखीचे गोल रिंगण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली - तालुक्‍यातील नर्सी नामदेव येथील संत नामेदव महाराज यांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून, रविवारी (ता. २३) या पालखीचे पहिले रिंगण हिंगोलीत झाले. 

तेवीस वर्षांपासूनची परंपरा असलेली संत नामदेव महाराज पालखी पंढरपूरकडे नरसी नामदेव येथून सकाळी साडेसातला मार्गस्थ झाली. केसापूर, सवड, देऊळगाव मार्गे सायंकाळी हिंगोलीत दाखल झाली. हिंगोलीतील रामलीला मैदानावर सायंकाळी पाचला रिंगण सोहळ्यास सुरवात झाली. या वेळी हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. रिंगण सोहळ्यादरम्यान अनेक भाविकांनी फुगड्यांचा फेर धरला. संत नामदेव महाराज व विठ्ठलनामाच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले.

loading image