esakal | हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात सावधानतेचा इशारा- एस. पी. पवार

बोलून बातमी शोधा

file photo}

शेतकऱ्यांनी कोणत्याही रोगाविषयी मनात घर करुन राहू नये, यापूर्वी लाळ्या खुरकूत आजार येऊन गेला आहे. त्यावर देखील पशु संवर्धन विभागाने नियंत्रण मिळवीले आहे,

marathwada
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात सावधानतेचा इशारा- एस. पी. पवार
sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात मागील महिन्यात कुक्कुट पालनच्या पक्षावर काही भागात बर्ड फ्ल्यू येऊन गेल्याने शेतकऱ्यांनी धास्ती घेतली होती. ती पशुसंवर्धन पथकाकडून सर्व्हेक्षण झाल्याने हा रोग जिल्ह्यातून नष्ट झाल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही रोगाविषयी मनात घर करुन राहू नये, यापूर्वी लाळ्या खुरकूत आजार येऊन गेला आहे. त्यावर देखील पशु संवर्धन विभागाने नियंत्रण मिळवीले आहे, यासाठी जवळपास अडीच लाख जनावराचे लसीकरण करण्यात आले आहे.

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाकडून शेतकऱ्यांनी आपले पशुधनाची खबरदारी घेऊनच त्यांची व्यवस्था करावी असे आवाहन सहायक आयुक्त एस. पी. पवार यांनी केले आहे. जिल्ह्यात मागील २०१९- २० वर्षात झालेल्या पशू जनगणना नुसार गाय- बैल दोन लाख २९ हजार ७५६, तर म्हैस, रेडा ७२ हजार ९२०, शेळ्या व मेंढ्या एक लाख ५० हजार ,कोंबड्या व कुकूट पालन पक्षी एक लाख ६४ हजार ९०० अशी प्राप्त आकडेवारी आहे. यावर शेतकऱ्यांनी  लक्ष देण्याची अधिक गरज आहे. जिल्ह्यात मागील महिन्यात कुक्कुट पालनच्या पक्षावर काही भागात बर्ड फ्ल्यू येऊन गेल्याने शेतकऱ्यांनी धास्ती घेतली होती.

ती आज पशु संवर्धन पथकाकडून सर्व्हेक्षण झाल्याने हा रोग जिल्ह्यातून नष्ट झाल्याचे चित्र दिसत असून, शेतकऱ्यांनी कोणत्याही रोगा विषयी मनात घर करुन राहू नये, यापूर्वी लाळ्या खुरकूत आजार येऊन गेला आहे. त्यावर देखील पशु संवर्धन विभागाने नियंत्रण मिळवीले आहे, यासाठी जवळपास अडीच लाख जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. पुढील महिन्यात जनावरांना पीपीआर आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठीच आतापासून शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त एस. पी. पवार यांनी केले आहे.

कोरोनाच्या काळात एक वर्षापासून शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही नवीन योजना शासनाकडून आली नाही. नवीन योजनेचे मार्च नंतरच सुरु होईल असेही त्यांनी बोलताना सांगितले. १९-२० च्या योजनांचे आयोजन करुन निवड प्रक्रिया करण्याची तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे