वसमत : ३१४ हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार नवघरे

वसमत : ३१४ हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली

वसमत : तालुक्यातील १९ गावांतील कोल्हापुरी बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे ३१४ हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. तालुक्यातून वाहणाऱ्या नदीवर कोल्हापुरी बंधारे बांधून पाणी साठवण केल्यास सिंचनास त्याचा फायदा होऊन विकास साधता येईल, हा संकल्प आमदार नवघरे यांनी करुन मागील दीड वर्षांपासून मंत्रालयात संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरु ठेवला. मापदंडातील दुरुस्ती नंतर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार व मृद व जलसंधारण विभागाने वसमत तालुक्यातील १९ गावांतील कोल्हापुरी बंधाऱ्यांना मंजुरी दिली आहे. तसेच याबाबत आदेश पारीत केले आहेत. यामुळे १४०३.४६ स.घ.मी. पाणीसाठा तयार होऊन तालुक्यातील ३१४ हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

मंजुरी मिळालेल्या गावांमध्ये विरेगाव, बळेगाव, खंदारबन, अरळ १, अरळ २, किन्होळा, हट्टा घामोडी नदी, इंजनगाव/पळसगाव, कुरुंदा, गुंज, टाकळगाव, कौठा, माळवटा, बोराळा, सोमठाणा, खाजमापुरवाडी, खांडेगाव, खंदारबन या गावांचा समावेश आहे. तसेच औंढा तालुक्यातील दौडगाव या गावाचाही समावेश आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. संबंधित बंधाऱ्यांच्या पूर्णत्वानंतर त्या-त्या परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ व पर्यायाने तालुक्याच्या विकासाला वेग येणार आहे.

Web Title: Wasmat 314 Hectare Area Come Under

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top