वसमत पोलिसांचा बाभुळगावात छापा; ४१ हजाराची दारु जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील बाभुळगाव येथे देशी व विदेशी दारुची अनाधिकृत विक्री होत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती.
वसमत पोलिसांची कारवाई
वसमत पोलिसांची कारवाई
Updated on

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी (ता. तीन) सायंकाळी सात वाजता तालुक्यातील बाभुळगाव येथे दोन ठिकाणी छापा मारुन घरात अनाधिकृत देशी व विदेशी दारुचा साठा जप्त केला. यावेळी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी त्यांच्याकडून ४१ हजार २८० रुपयाची देशी व विदेशी दारु जप्त करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील बाभुळगाव येथे देशी व विदेशी दारुची अनाधिकृत विक्री होत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, यतिन देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी वशीम हाश्मी, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विलास गवळी, मधुकर आडे, अजय पंडित, साहेबराव चव्हाण, सचिन बिजले, श्री. विभुते यांनी सापळा रचून गुरुवारी सायंकाळी सात वाजता बाभुळगाव येथे कारवाई केली.

हेही वाचा - कोव्हॅक्सीनची लस ही 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दुसरा डोस देण्यात येणार आहे

गुलाब तुळशीराम चव्हाण हा आपल्या घरात देशी व विदेशी दारुचा साठा करुन विक्री करत असताना छापा टाकला. या वेळी त्यांच्या घरात आठ देशी दारुचे तर दोन विदेशी दारुचे बाॅक्स ज्याची किंमत ३८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. तसेच त्याचवेळी बाभुळगावात आकाश खोब्राजी कांबळे व शेख जहीर शेख उस्मान हे चोरुन देशी दारु विकत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्यावर छापा टाकून त्यांच्याकडून प्रत्येकी २१ व २७ बाँटल ज्याची किंमत दोन हजार ८८० रुपये जप्त करण्यात आले. दोन्ही छाप्यात मिळून ४१ हजार २८० रुपयाची देशी व विदेशी दारु जप्त करण्यात आली. सदरील तिघांना अटक करुन मुद्देमालासह ग्रामीण पोलिस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Aadul Theft
Teachers Agitation
tushar jadhav
Protest outside the Tehsil office
Marathi News Esakal
www.esakal.com