वसमत तहसीलचा लिपीक निलंबित;  ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार करणे भोवले

file photo
file photo
Updated on

शिरडशहापूर ( जिल्हा हिंगोली ) : जानेवारी महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सोशल मिडीयावरुन औंढा नागनाथ तालुक्यातील सेंदुरसना येथील उमेदवाराचा प्रचार केल्यामुळे वसमत येथील लिपिकास निलंबित करण्यात आले आहे.

जानेवारी महिन्यात औंढा नागनाथ तालुक्यातील सेंदुरसेना येथे ग्रामपंचायतची निवडणूक होती. त्यामध्ये वसमत तहसीलमधील लिपिक ईश्वर ढेकळे हे या कालावधीत वैद्यकीय रजेवर होता. रजेच्या कालावधीत त्यांच्या मूळ गावी राहत असताना सेंदुरसेना ग्रामपंचायत निवडणूकमधील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या नावाचे प्रचारसाहित्य सोशल मिडीयावर स्वत: च्या मोबाइलवरुन प्रसिध्द करुन प्रचार केला होता. तसेच शासकीय कर्मचारी असताना जाणीवपूर्वक बेजबाबदार वर्तन केल्यामुळे त्यामुळे शासनाचे प्रतिमा मलिन झाली असल्यामुळे ईश्वर ढेकळे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचा भंग केल्याने त्यांना निलंबित करणे बाबतचा प्रस्ताव तहसीलदार वसमत यांनी सादर केला होता. त्यानुसार ढेकळे यांना कारणे दाखवा नोटीस देऊन लेखी खुलासा सादर करण्यासाठी कळविण्यात आले होते.

त्यानुसार त्यांनी लेखी खुलासा सादर केला होता. परंतु सदरील खुलासा संयुक्तिक नसल्यामुळे अमान्य करण्यात आला त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून सदरील बाब ही गंभीर स्वरुपाची असून महाराष्ट्र नागरी सेवा नियमाच्या विरुद्ध असल्यामुळे  ढेकळे यांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत  व त्यांना निलंबित केलेले आहे.

तसेच हा आदेश अमलात असेपर्यंत तेवढ्या कालावधीत यांना मुख्यालय उपविभागीय अधिकारी वसमत येथे देण्यात आले आहे. त्यांना कार्यालय प्रमुखांची परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच निलंबन कालावधीत यांना खाजगी नोकरी इतर व्यवसाय करता येणार नाही असे आदेशामध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Medical Negligence Alleged: Woman Dies After Hernia Surgery in Umarga
Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar
Prestigious State-Level Award for Principal Dr. Chandrasen Kothawale
NEET Paper Leak Probe: CBI Conducts Secret Investigation in Ambajogai
Marathi News Esakal
www.esakal.com