कार अपघातात वसमतचे दोघे जागीच ठार  

Hingoli News
Hingoli News

वसमत (जि. हिंगोली) :  निळा-एकदराजवळ शुक्रवारी (ता. पाच जून) पहाटे दोनच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. 

याबाबत माहिती अशी की, कोनाथा (ता.वसमत) येथील माधव बेंडे, शिवकुमार बेंडे व वसमत येथील व्यापारी धिरज काबरा हे तिघेजण नांदेडहून वसमतला येत होते. दरम्यान नांदेड-आसेगाव मार्गावरील निळा- एकदरा गावाच्या जवळ शुक्रवारी पहाटे दीड ते दोनच्या सुमारास झाडावर कार अदळून अपघात झाला.  यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. अपघात एवढा भिषण होता की, रस्त्याच्या शेजारील झाड मुळासकट जमीनीवर उपटून पडले.

या अपघातात समोर बसलेले माधव बेंडे व धिरज काबरा यांचा जागेवरच मृत्यू झाला. शिवकुमार बेंडे हे जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. अपघात एवढा भिषण होता की गाडीतील समोरचे दोन्ही एअर बॅग फुटून बाहेर आले. धिरज काबरा (वय ३०) हे वसमतचे प्रतिष्ठीत व्यापारी तथा भाजपाचे नगरसेवक  संजय काबरा यांचे सुपुत्र होते.  श्री. काबरा यांच्या पश्चात एक वर्षाचा मुलगा आहे, तर दुसरे मयत माधव बेंडे (वय ४७) हे कोनाथा येथील प्रतिष्ठीत शेतकरी असून ते वसमत येथील बहिर्जीनगर भागात रहात होते. त्‍यांना एक मुलगी व दोन मुले आहेत. मुलीचे लग्न झाले असुन एक मुलगा शिकत आहे तर दुसरा शेती करतो.

हे देखील वाचाच - Video - पर्यावरण संतुलनासाठी संवेदनशील होण्याची गरज, कशी? ते वाचाच
 
जखमी शिवकुमार बेंडे यांना नांदेड येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मयत माधव बेंडे व धिरज काबरा यांचे वसमत येथील उपजिल्हा रूग्ण्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. माधव बेंडे यांच्यावर कोनाथा तर धिरज काबरा यांच्यावर वसमत येथील अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दरम्यान घटनेची माहिती कळताच वसमत येथील शासकीय उपजिल्हा रूग्ण्यालयात आमदार राजू नवघरे, शिवसेनेचे राजू चापके यांनी धाव घेतली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com