Jalna Water Crisis : पाणीबाणीचे संकट; १६ गावांसह १३ वाड्यांना सध्या २८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

जालना शहराला जायकवाडी धरणाचा आधार
water crisis 13 wadi including 16 villages are currently supply water through 28 tankers Jayakwadi Dam
water crisis 13 wadi including 16 villages are currently supply water through 28 tankers Jayakwadi DamSakal

जालना : जिल्ह्यात यंदा पाऊस झालेला नाही. त्यामुळे मध्यम व लघू प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे. शिवाय १६ गावांसह १३ वाड्यांना २८ टॅंकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. तर दुसरीकडे जालना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयामध्ये केवळ दीड फूट पाणीसाठा आहे. परिणामी शहराची पाण्याची मदार जायकवाडी धरणाचा आधार आहे. मात्र, जायकवाडी धरणाचे वरून पाणी सोडण्यास विरोध होत असल्याने पुढील काळात शहरात पाणीबाणीचे संकट येण्याची शक्यता आहे.

जालना शहराला घाणेवाडी जलाशय आणि जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा होत असताना काही महिन्यांपूर्वी बारा महिने पाणी संकट होते. मात्र, तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी तत्कालीन पालिका आणि सध्या महापालिका प्रशासनाची बैठक घेऊन पाच दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शहरात मागील काही महिन्यांपासून शहरातील पाणी पुरवठ्या सुरळीत झाला असून नागरिकांना पाच ते सहा दिवसाआड पाणी मिळत आहे.

मात्र, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयात केवळ दीड फूट पाणी आहे. तर जायकवाडी धरणात ४५ टक्के पाणीसाठा आहे. अशात नगर, नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध होत आहे. जर जायकवाडी धरणात वरील धरणातून वेळ पाणी सोडले नाही आणि पाणीपातळी खालावली तर शहरातील नागरिकांना पुन्हा  पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

मध्यम व लघु प्रकल्पात अल्प पाणीसाठा

जिल्ह्यात सात मध्यम आणि ५७ लघू प्रकल्पात जेमतेम सुमारे बारा टक्के पाणीसाठा आहे. यात सात मध्यम प्रकल्पात २१.५६ टक्के, तर लघू प्रकल्पांमध्ये ८.१८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जुई मध्यम प्रकल्पाने तळ गाठल्याने भोकरदन शहरासह अनेक खेड्यांवर पाणी टंचाईचे संकट आले आहे.

सध्या २८ टॅंकरने पाणीपुरवठा

जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात आज घडीला २८ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहेत. १६ गावांसह १३ वाड्यांमधील ५२ हजार ६९९ ग्रामस्थांना या टँकरचा आधार आहे. यात जालन तालुक्यातील चार गावे, पाच वाड्या, बदनापूर तालुक्यातील नऊ गावे, आठ वाड्या, भोकरदन तालुक्यात तीन गावे एक वाडी, मंठा तालुक्यातील एका वाडीला  टँकर सुरू आहेत. शिवाय ७० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

जायकवाडी पाण्यावर रब्बी हंगाम

जायकवाडी धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडले तरच गोदाकाठावरील शेतीला पाणी मिळते. त्यामुळे जायकवाडीच्या पाण्यावर गोदाकाठावरील शेतीचा रब्बी हंगाम अवलंबून आहेत. नगर, नाशिक येथील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडले तरच खाली शेतीला पाणी मिळेल.  

एमडब्लूआरआरए कायद्यानुसार जायकवाडी धरणात नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडणे बंधनकारक आहे. ता. १५ ऑक्टोबरपर्यंत जर जायकवाडी धरणात ६५ टक्क्यांपेक्षा अधिक असणारे पाणी हे जायकवाडी सोडले पाहिजे. जर या विरोध होत असेल तर तो चुकीचा आहे. जायकवाडीच्या पाण्यावर येथील पिण्याचे आणि शेतीचे पाणी अवलंबून आहे. जर विरोध होत असे तर हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन करू.

— राजेश टोपे, आमदार, घनसावंगी

जालना शहरात सध्या तरी पाणी टंचाईचा प्रश्‍न नाही. जायकवाडी धरणातून अधिकचे पाणी उचलण्याचे नियोजन सुरू आहे. शहराला पुरेसा पाणी पुरवठा होईल, याची दक्षता घेतली जात आहे.

— संतोष खांडेकर, प्रभारी आयुक्त, महापालिका, जालना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com