esakal | टोकाई गडावर अखेर पाणी पोहोचले, वृक्षांना मिळणार जीवदान

बोलून बातमी शोधा

file photo}

गडावरील झाडे जगविण्यासाठी आवश्यक असलेले कायमचे पाणी प्राप्त झाल्याने झाडांना जीवनदान मिळाले आहे

marathwada
टोकाई गडावर अखेर पाणी पोहोचले, वृक्षांना मिळणार जीवदान
sakal_logo
By
मारोती काळे

कुरुंदा ( जिल्हा हिंगोली ) : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे गेल्या दोन वर्षापासून टोकाई गड हिरवेगार व सूंदर निसर्गरम्य बनविण्यासाठी वृक्षप्रेमींची धडपड सुरु असून तेथील वृक्षप्रेमींच्या प्रयत्नाला यशाची पराकाष्ठा होत आहे. गडावरील झाडे जगविण्यासाठी आवश्यक असलेले कायमचे पाणी प्राप्त झाल्याने झाडांना जीवनदान मिळाले आहे.

कुरुंदा येथील टोकाई देवीचा गड सर्वदूर प्रसिध्द असल्याने या गडावर परजिल्ह्यातुन भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्रात भाविकांची अलोट गर्दी असते. चित्रपट अभिनेते संयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतुन टोकाई गडावर वृक्ष लागवडीची चळवळ उभी राहिली व त्यांच्या सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेच्या प्रेरणेतुन मोठे सहकार्य वेळोवेळी लाभले.

सुंदर आणि हिरवेगार गड करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून वृक्षप्रेमींची धडपड सुरु आहे. आवश्यक ठिकाणी झाड लावणे, त्याला नेहेमी पाणी देणे, आक्सिजन पार्क उभारणीचे काम पूर्णतः करण्यात आले आहे.

पार्क आक्सिजनमध्ये औषधी वनस्पतीचे वृक्ष तर या ठिकाणी उद्यान निर्माण करण्यासाठी नियोजित जागा आहे. तेही काम हाती घेतल्या जाणार आहे. या गडावर मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्यात आली परंतु पाण्याअभावी हे झाडे उन्हाळ्यात करपुन जात होती. ही झाडे जिवंत ठेवण्यासाठी पाण्याची गरज होती. एका शेतकऱ्यांने एक गुंठे जागा विहिरीसाठी उपलब्ध करुन दिल्याने त्या ठिकाणी विहिरीचे काम जवळपास पूर्ण झाले असून दोन किमी अंतरावरुन पाईपलाईन खोदून गडावर पाणी आणण्यात यश आले आहे.

त्यामुळे झाडे लावण्याचा व वाचवण्यासाठी मुबलक पाण्यामुळे सोयीस्कर ठरणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून वृक्षप्रेमीच्या मेहनतीचे हे यश मनावे लागेल.पाण्याचे स्तोत्र उपलब्ध झाल्याने उन्हाळ्यात देखील वृक्षलागवडच्या कामाला गती मिळेल. येणाऱ्या काळात फुलपाखरांसाठी पार्कची उभारणी तर चिमणी, कबूतरांसाठी पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे असे वृक्षप्रेमींच्या वतीने सांगण्यात आले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे