

Electricity Shortage Sparks Farmers’ Outrage; Power Substation Gherao in Maharashtra
esakal
-जमील पठाण
कायगाव: शेतीपंपांसाठी केवळ सहा तास वीजपुरवठा आणि त्यातही वारंवार खंडित होणाऱ्या पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या कायगाव परिसरातील शेतकऱ्यांनी शनिवारी ( ता.20)मध्यरात्री गणेशवाडी येथील वीज उपकेंद्रावर धडक मोर्चा काढत महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.