जायकवाडीची पाणी पातळी ८७ टक्क्यांवर

आदित्य वाघमारे
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे आता धरणाच्या दोन्ही कालव्यांसह गोदापात्रातही पाणी सोडायला सुरवात झाली आहे. सव्वाशे टीएमसी क्षमता असलेले जायकवाडी धरण ८६.९८ टक्के भरले आहे. सोमवारी  सकाळी पाण्याचा ओघ १० हजार क्यूसेकने कमी झाला असला तरी धरणातून पाणी सोडायचा सिलसिला सुरूच आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे आता धरणाच्या दोन्ही कालव्यांसह गोदापात्रातही पाणी सोडायला सुरवात झाली आहे. सव्वाशे टीएमसी क्षमता असलेले जायकवाडी धरण ८६.९८ टक्के भरले आहे. सोमवारी  सकाळी पाण्याचा ओघ १० हजार क्यूसेकने कमी झाला असला तरी धरणातून पाणी सोडायचा सिलसिला सुरूच आहे.

दरम्यान, माजलगावकडे जाणाऱ्या कालव्यातून अगोदर ६०० क्यूसेकने करण्यात येणारा विसर्ग हा आता ८०० क्यूसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे. डाव्या कालव्यातूनही विसर्ग सुरू करण्यात आला असून, तो ४०० क्यूसेक एवढा आहे. विविध पाणी पुरवठा योजनांसाठी इथून पाणी वितरित केले जाते. या शिवाय गोदापात्रातही विसर्ग सुरू झाला असून, जलविद्युत केंद्रातून १५८९ क्यूसेकने पाणी गोदावरीत सोडण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी नऊ वाजलयापासून हा प्रवाह सुरू झाला असून, नदीपात्रातील पाणी शहागड बंधाऱ्यातून नांदेडकडे जात आहे. जायकवाडीतील जिवंत पाणीसाठा हा १८८८.३९ दशलक्ष घनमीटरवर पोचला असून, सध्याची आवक ही ५२ हजार ९१६ एवढी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water level increases in jayakwadi