इसापूर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

संजय कापसे 
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

इसापूर धरणाच्या लाभक्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने मोठी वाढ झाली आहे मागील 24 तासात धरणांमधील पाण्याच्या टक्केवारीत बारा टक्क्यांनी वाढ झाली असून धरणाचा पाणीसाठा 62 टक्यावर येऊन पोहोचला आहे.

कळमनुरी- इसापूर धरणाच्या लाभक्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने मोठी वाढ झाली आहे मागील 24 तासात धरणांमधील पाण्याच्या टक्केवारीत बारा टक्क्यांनी वाढ झाली असून धरणाचा पाणीसाठा 62 टक्यावर येऊन पोहोचला आहे.

इसापूर धरणाच्या लाभक्षेत्रात मागील काही दिवसापासून समाधानकारक पाऊस होत असल्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली आहे मागील तीन वर्षांचा अनुभव पाहता धरणाच्या पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ होऊ शकली नव्हती त्यातच यावर्षी उन्हाळ्यात धरणाच्या दोन्ही कालव्यांमधून पाणीपातळीच्या समांतर रेषेपर्यंत पाणी सोडण्यात आल्यामुळे धरणाची पाणीपातळी झपाट्याने खाली उतरली होती धरणांमधील पाणीसाठा मृत साठ्यापर्यंत येऊन पोचला होता तर धरणाची टक्केवारी मायनसमधे येऊन पोहोचली होती या स्थितीत धरणामध्ये यावर्षीच्या पावसाळ्यात अपेक्षित पाणीसाठा जमा होणे गरजेचे झाले होते धरणाच्या जलाशयावर उजव्या व डाव्या कालव्यावर मराठवाडा विदर्भातील सिंचन व अनेक पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत या पावसाळ्यामध्ये धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस होत असल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे त्यातच मागील आठ दिवसात धरणाच्या लाभक्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे.

लाभक्षेत्रात मागील आठ दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाण्याच्या टक्केवारी मध्ये दुपटीने वाढ झाली आहे आहे मागील 24 तासात धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पाहता 12 टक्के पाणीसाठा वाढला आहे धरणात आजमितीस 62.03 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरणाची पाणी पातळी 437.06 मीटरवर येऊन पोहोचली आहे एकूण पाणीसाठा 913.0135 द.ल.घ.मी. झाला आहे. उपयुक्त पाणीसाठा 598.0498 द.ल.घ.मी. पर्यंत येऊन पोहचला आहे धरणामध्ये  येणाऱ्या पाण्याची आवक 24.6486 द.ल.घ.मी. असून एकूण आवक 691.9115 द.ल.घ.मी. एवढी झाली आहे. मागील काही वर्षात धरणात प्रथमच अपेक्षित पाणीसाठा पाणी पातळी पर्यंत येऊन पोहोचत आहे.

Web Title: The water level of Isapur dam is increased