
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या वरील भागात जोरदार पाऊस होत असल्याने जायकवाडीसह ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही वाढ सरासरी टक्केवारीच्या तीनपट आहे. गेल्यावर्षी या प्रकल्पांमध्ये १२.६५ टक्के पाणीसाठा होता. यंदा मंगळवारच्या (ता.२४) च्या अहवालानुसार तो सरासरी ३७.२६ टक्के झाला आहे. या महिन्यात आतापर्यंत २२.१९ दशलक्ष घनमीटर पाण्याची या प्रकल्पांमध्ये आवक झाली आहे.