Beed Newssakal
मराठवाडा
Beed News: पैठण येथील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; माजलगाव आणि गेवराईतील नदीकाठच्या गावांना प्रशासनाची सतर्कतेची सूचना
Jayakwadi Dam: पैठण येथील जायकवाडी धरणातून ९४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे माजलगाव व गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीकिनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बीड : पैठण येथील जायकवाडी धरणातून ९४३२ क्युसेक एवढा विसर्ग गुरुवारी (ता. ३१) तीननंतर सुरू झाला. त्यामुळे गेवराई व माजलगाव तालुक्यांतील गोदावरी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.