Water Crisis : जलसाठ्यात नऊ टक्के घट; महिनाभरातील स्थिती, मराठवाड्यात ५४ टक्के उपयुक्त साठा
Water Conservation : उन्हाळ्याच्या प्रारंभासोबतच जलसाठ्यात घट होऊ लागली आहे. मराठवाड्यातील जलसाठा गेल्या २५ दिवसांत ९ टक्क्यांनी कमी झाला असून, सध्या ५४ टक्के उपयुक्त साठा उपलब्ध आहे.
छत्रपती संभाजीनगर : उन्हाळा सुरू होताच पाण्याची मागणी वाढली आहे. त्याशिवाय बाष्पीभवनालाही सामोरे जावे लागणार आहे. गत वर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील प्रकल्पांत यंदा चांगला साठा असला तरी गेल्या पंचवीस दिवसांत त्यात नऊ टक्क्यांनी घट झाली आहे.