Water Issue in thergaon village
sakal
पाचोड - ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी विविध योजना राबविण्याचा सर्वत्र 'फार्स' सुरु असला तरी मार्चपासून सलगरित्या पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची जिवघेणी दमछाक होत असल्याचे चित्र थेरगाव (ता. पैठण) येथे पाहवयास मिळते.
साडेचार हजार लोकसंख्येच्या गावांसाठी चौदा वर्षापुर्वी थेरगाव (ता. पैठण) येथे साडेबारा लाख रुपये खर्चून 'स्वजलधारा' पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र ही कुचकामी ठरत असल्याचे लक्षात येताच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत नव्याने सरकारी गायरान जमिनीवर पाणीपुरवठा विहीर खोदण्यात आली,ज्याला थेंबभर पाणी मिळाले नाही. केवळ या कोरड्या विहीरीत अभियंत्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यानी 'हातच' धुऊन घेतले.