

Jalna Watermelon Intercrop
esakal
कुंभार पिंपळगाव: गेल्या दोन-तीन वर्षांपासून टरबूज-खरबूज पिकावर कधी बाजारभावाचा, तर कधी व्हायरसचा फटका बसत असल्याने अनेक शेतकऱ्यांची शेती तोट्यात जात होती. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता गुंज बुद्रुक (ता. घनसावंगी) येथील तरुण शेतकरी विष्णू कचरे यांनी उसाच्या पिकात घेतलेल्या खरबुजाच्या आंतरपिकातून अवघ्या तीन महिन्यांत तब्बल चार लाखांचे उत्पन्न मिळवत यशाची गोड चव चाखली आहे.
योग्य नियोजन, मेहनत आणि निसर्गाची साथ यामुळे अडीच एकर क्षेत्रात घेतलेल्या या प्रयोगातून त्यांना सुमारे अडीच लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे.