नांदेडच्या वजिराबाद पोलिसांनी धरला ‘हा’ चोर 

फोटो
फोटो

नांदेड : शहरात मोबाईल चोरी करणारा चोरटा वजिराबाद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून पोलिसांनी एक लाख २८ हजाराचे विविध कंपनीचे १६ मोबाईल जप्त केले.  

शहरात आठवडी बाजार, पायी जातांना कानाला लावलेला मोबाईल किंवा हातात धरुन जाणाऱ्याच्या हातला झटका देऊन मोबाईल पळविणे आदी घटना वाढल्या आहेत. या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी शहरातील सर्वच ठाणेदारांना सक्त सुचना दिल्या आहेत. मोबाईल व दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे. 

वजिराबाद पोलिसांची कारवाई 
 
वजिराबाद गुन्हे शोध पथकानी दोन दिवसापूर्वीच एक दुचाकी चोर पकडून त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त केल्या होत्या. तो सध्या पोलिस कोठडीत असतांना पुन्हा सहाय्क पोलिस निरीक्षक सुनील पुंगळे यांच्या पथकाने एका चोराला ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केली असता त्याच्याकडे विविध कंपनीचे १६ मबाईल आढळून आले. हे सर्व मोबाईल सोबत घेऊन तो हैद्राबाद येथे जावून फॉर्म्याट मारत असल्याचे त्याने पोलिसाला सांगितले. त्याच्याकडून जप्त केलेल्या मोबाईलमधून एक मोबाईल चोरी झाल्याचे वजिराबाद पोलिस ठाण्याच्या दप्तरी नोंद आहे. सुनिल पुंगळे यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास परिविक्षाधीन पोलिस फौजदार एच. पी. घुले करत आहेत. पथकाचे उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के, पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी कौतुक केले आहे.   

शेतीचा मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्यांवर

नांदेड : राज्य महामार्गात गेलेल्या शेतीचा मावेजा मिळत नसल्याने काम बंद पाडणाऱ्या पिडीत शेतकऱ्यांविरुद्ध कुंटुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा प्रकार सोमवारी (ता. २७) दुपारी घडला. 

वजिरगाव (ता. नायगाव) येथील काही शेतकऱ्यांची शेती राज्य महामार्ग क्रमांक २६१ मध्ये गेले. परंतु बाधीत शेतकऱ्यांना पाहिजे असा मोबदला शासनाकडून देण्यात आला नाही. एवढेच नाही तर या रस्‍त्याचे काम सुरू झाले. वजिरगाव शेत गट क्रमांक १३४, १३५ मधून हा रस्ता जात असल्याने या ठिकाणी हायब्रीड युनीटी अंतर्गत सार्वजनीक बांधकाम उपविभाग नायगाव मार्फत काम सुरू आहे. सन १९७२ पासून या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. 

पोकलेनसमोर दुचाकी आडव्या

जोपर्यंत शेतीचा योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यत आम्ही काम करून देणार नाही. असे म्हणून बाधीत शेतकऱ्यांनी काम बंद पाडले. एवढेच नाही तर पोकलेनसमोर आपल्या दुचाकी गाड्या आडव्या लावून पोकलेन चालकास शिवागाळ केली. काम बंद पाडून रस्त्यावर ठाण मांडून शासकिय कामात अडथळा निर्माण केला. हे कारण पुढे करुन सार्वजनीक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता प्रांजल प्रमोद पाटील यांच्या फिर्यादीवरुन कुंटुर पोलिस ठाण्यात शेतकऱ्यांविरुद्ध शासकिय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुहा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक दिनेश येवले करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com