जायकवाडी कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करु- जयंत पाटील

जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा नादुरुस्त असल्यामुळे या कालव्यातून पाण्याचे वहन पुर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे परभणी मतदारसंघातील 50 टक्के गावे ही पाण्यापासून वंचित राहू लागली आहेत.
जायकवाडी प्रकल्पाबाबत निवेदन देताना
जायकवाडी प्रकल्पाबाबत निवेदन देताना
Updated on

परभणी ः जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद केली जाईल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी परभणीतील शिष्टमंडळाला दिली. आमदार डॉ. राहूल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने या संदर्भात श्री. पाटील यांची मंगळवारी (ता. आठ) भेट घेतली.

जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा नादुरुस्त असल्यामुळे या कालव्यातून पाण्याचे वहन पुर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे परभणी मतदारसंघातील 50 टक्के गावे ही पाण्यापासून वंचित राहू लागली आहेत. या कालव्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या संदर्भात आमदार डॉ. राहूल पाटील यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेत या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्यासाठी निधीची तरतूद करु, असे ठोस आश्‍वासन या शिष्टमंडळास दिले.

आमदार डॉ. राहूल पाटील यांच्यासह दिनेश बोबडे, रवि पतंगे देशमुख, प्रभाकर जैस्वाल, तानाजी भोसले, अनिल डहाळे, वसिक ईनामदार, बाळासाहेब रसाळ आदींचा शिष्ठमंडळात समावेश होता.

हेही वाचा - मुख्यमंत्री साहेब माझी जात कुठली; हिंगोलीच्या मराठा युवकाचे मुख्यमंत्र्याला निवेदन

जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर परभणी जिल्ह्यातील 97 हजार हेक्टर लाभ क्षेत्र आहे. परंतू हा कालवा नादुरूस्त असल्यामुळे पाण्याचे वहन पुर्ण क्षमतेने होत नाही. विशेषतः किलोमीटर 122 येथे दोन हजार100 क्युसेस वहन क्षमता असताना फक्त 900 ते 1100 क्युसेस क्षमतेने पाण्याचे वहन होते. यात परभणी विधानसभा मतदारसंघातील 50 टक्के गावे ही कालव्याच्या टेल भागात आहे. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांना आवश्यक ते पाणी मिळत नाही. पैठणमधील कालव्याचे दुरुस्ती करण्याबाबत बैठक घेण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

- डॉ. राहूल पाटील, आमदार, परभणी

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Senior Congress Leader Shriram Patil Rajurkar Passes Away
Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.
Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.
Marathi News Esakal
www.esakal.com