

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांना सव्वातीन तास मारहाण करण्यात आली. ज्या हत्यारांनी त्यांना मारण्यात आले, त्याची ‘वेपन एक्झामिशन टेस्ट’ करण्यात आली असून त्याचा अहवाल समोर आला आहे. आरोपींनी देशमुख यांना मारण्यासाठी खास हत्यारे तयार केली होती.