Weather Update : उन्ह वाढले; पारा ३९.९ अंशांवर

उकाड्याने जालनेकर हैराण, उष्माघातापासून बचाव करा
weather update jalna increases heat wave Avoid heatstroke do this health
weather update jalna increases heat wave Avoid heatstroke do this healthsakal

जालना : शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्याने शुक्रवारी (ता. १४) रात्री थैमान घातले होते. मात्र, असे असले तरी दुसरीकडे शहराचा तापमानाचा पारा चढताच असून, शनिवारी (ता. १५) शहराचे तापमानाचा ३९.९ सेल्सिअस अंशपर्यंत गेल्याची नोंद खरपुडी कृषी विज्ञान केंद्र येथे झाली आहे.

त्यामुळे उकाड्याने जालनेकर हैराण झाले असून, उष्माघातापासून स्वतःचा बचाव करावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. दरम्यान सायंकाळी शहरात पावसाचा शिडकावा झाला. यंदाच्या उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, गारपीट, ढगाळ वातावरणामुळे थंड-गरम असे वातावरण राहिले आहे.

त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही तापमान वाढल्याचे दिसून आले नाही. शिवाय शुक्रवारी रात्री शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यानंतरही शनिवारी उन्हाची तीव्रता वाढल्याचे दिसून आले.

शनिवारी खरपुडी कृषी विज्ञान केंद्र येथे जालना शहराचे कमाल तापमान हे ३९. ९ सेल्सिअस अंश तर किमान तापमान हे २१.८ सेल्सिअस अंश असल्याची नोंद झाली. त्यामुळे उकाड्याने जालनेकर हैराण झाले आहेत.

या वाढत्या उन्हाळ्यामुळे दुपारी शहरात अनेक रस्त्यांवर शुकशुकाट पाहण्यास मिळत असून, या वाढत्या उन्हापासून नागरिकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी टोपी, रुमाल आदी बाबींचा वापर करणे गरजेचे आहे. शिवाय पुढील काही दिवस उन्हाचे चटके अधिक वाढण्याची शक्यता आहे.

उष्माघाताची लक्षणं

उच्च तापमान, मळमळणं, उलट्या होणं, भूक एकदम मंदावणं, पाण्याचा अभाव/तहान लागणं, घाम येणं, श्वास लागणं, गंभीर डोकेदुखी, सततची चिडचिड, त्वचेवर लालसरपणा, तोंडाला कोरड पडणं, श्वास घेण्यात अडथळा, अस्वस्थता जाणवणं, लघवी कमी होणं, लघवीच्या जागी जळजळ

कशी काळजी घ्यावी?

  • भरपूर पाणी, द्रव्य पदार्थ, फळांचा रस घ्या., स्वत:ला हायड्रेट ठेवा.

  • शक्य असल्यास रोज तीन ते चार लीटर पाणी प्या.

  • घट्ट कपडे वापरणं टाळा. फिक्या रंगाचे कपडे घालण्यास प्राधान्य द्या.

  • दिवसा शक्यतो घरातच राहणं पसंत करा. दुपारी उन्हात बाहेर पडणं शक्यतो टाळा.

  • बाहेर जात असताना सनस्क्रीन लोशन लावूनच जा.

  • बाहेर जाताना डोक्यावर टोपी किंवा काहीतरी बांधावं.

  • गरज असेल तेव्हाच बाहेर पडा.

  • मूत्रपिंड रुग्णांनी सावध असणं आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com