Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

पैठण तालुक्यातील आडूळसह परिसरात गेल्या आठवडाभरापासून चोरीच्या घटनांमध्ये झाली वाढ.
Aadul Theft

Aadul Theft

sakal

Updated on

आडूळ - पैठण तालुक्यातील आडूळसह परिसरात गेल्या आठवडाभरापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोमवारी (ता. १४) मध्यरात्री आडूळ खुर्द येथील किराणा दुकान फोडून २५ हजार रुपयांची रोकड चोरीला गेली. त्याच रात्री देवगाव येथील पशुपतीनाथ पंचमुखी महादेव मंदिरातील दानपेटी फोडून अंदाजे १५ ते २० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. गेवराई आगलावे येथील नगदेश्वर गडावरील मंदिरातील दानपेटी फोडण्याचाही प्रयत्न झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com