भक्तीगडाकडे निघालेल्या खासदार प्रीतम मुंडेंच्या फेरीचे जागोजागी स्वागत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

गोपीनाथ गड ते भगवान भक्तीगड अशा खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील फेरीचे रस्त्याने जंगी स्वागत केले जात आहे

बीड : गोपीनाथ गड ते भगवान भक्तीगड अशा खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील फेरीचे रस्त्याने जंगी स्वागत केले जात आहे.

तालुक्यातील घाटसावळी येथे भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत फड यांच्या नेतृत्वाखाली फेरीवर जेसीबीच्या साहय्याने फुलांची उधळण करण्यात आली. 

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने तीन वर्षांपासून संत भगवान बाबांचे जन्मगाव सावरगाव घाट येथे दसरा मेळावा होत आहे. या ठिकाणी बाबांची मूर्ती उभारून भगवान भक्तीगड असे नामकरण करण्यात आले आहे.

आज होत असलेल्या मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येत आहेत. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान या निमित्त खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गोपीनाथगड ते भगवान भक्तीगड अशी फेरी निघाली आहे. फेरीचे जागोजागी जंगी स्वागत होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A welcome to MP Pritam Munde in bhaktigad