हैदराबादला गेला अन् बीडमध्ये येताच पॉझिटिव्ह निघाला 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

सध्या बीड जिल्ह्यात ११, तर औरंगाबादेत १ अशा १२ जणांवर उपचार सुरू आहेत. रविवारी जिल्ह्यातून ७५ स्वॅब घेतले होते. यात ७४ निगेटिव्ह आले तर बीड शहरातील झमझम कॉलनीतील रहिवासी असलेला एक ६१ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला.

बीड : हॉटेलमालकाला घेऊन हैदराबादला गेलेला एक चालक बीडमध्ये परत आल्यावर कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. या एका रुग्णासह आता बीड जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ७० झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७० झाली आहे. पैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर ५७ कोरोनामुक्त झालेले आहेत.

सध्या बीड जिल्ह्यात ११, तर औरंगाबादेत १ अशा १२ जणांवर उपचार सुरू आहेत. रविवारी जिल्ह्यातून ७५ स्वॅब घेतले होते. यात ७४ निगेटिव्ह आले तर बीड शहरातील झमझम कॉलनीतील रहिवासी असलेला एक ६१ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला. हा व्यक्ती खासगी वाहनाचा चालक आहे. बीड शहरातील एका हॉटेलमालकासह तिघांना घेऊन तो हैदराबाद येथे गेला होता. ३ जून रोजी तो परत आला. बीडमध्ये येताच त्याला क्वारंटाइन करण्यात आले. परंतु खोकला येत असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात आणून स्वॅब घेण्यात आला. रविवारी रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आता त्याच्या संपर्कातील इतर लोकांचा शोध घेणे सुरू असून त्यांचाही स्वॅब घेणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Went to Hyderabad and got positive as soon as I arrived in Beed