काय आहे आयुर्वेदातील ‘उत्तरबस्ती’ उपचार 

File photo
File photo

नांदेड : नांदेड शहरात तसे दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत. यातील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या रसशाळेत जवळपास शंभरपेक्षा अधिक आयुर्वेदिक औषधींची निर्मिती करुन ती औषधी राज्यातील इतर आयुर्वेदिक रूग्णालयास पुरविली जात होती. याच शासकीय रूग्णालयात डॉ. राजेंद्र अमिलकंठवार यांनी लघवीच्या आजारावर उत्तरबस्ती ही आयुर्वेदिक उपचार पद्धती शोधुन काढली असून, ही उपचार पद्धती लघवीच्या आजाराने त्रस्त असलेल्या सामान्य रुग्णास वरदान ठरले आहे.


त्यांच्या या औषधोपचारातुन देशच नव्हे तर, इतर २८ देशातील लघवीच्या आजाराने त्रस्त असलेल्या हजारो रूग्णांनी उपचार घेवून समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे आयुर्वेदातील उत्तरबस्ती हा औषधोपचार पद्धती देशभरात नावारुपाला आली आहे. या औषधोपचारामुळे सामान्यातल्या सामान्य रुग्णास अगदी मोफत उपचार देता येत असल्याने डॉ. अमिलकंठवार यांनी समाधान व्यक्त केले आहे. 
 
काय आहे उत्तरबस्ती चिकित्सा 
ही एक आयुर्वेदिक उपचार पद्धती असून, मुत्राशयाच्या आजारावर हा रामबान उपाय म्हणून उत्तरबस्ती उपचार गरीब रूग्णांसाठी वरदान ठरली आहे. उत्तरबस्तीचे दोन प्रकार मानले जातात. एक म्हणजे गुद्दद्वारे आणि दुसरी मुत्रनलिकेद्वारे दिली जाणारी उत्तरबस्ती. यासाठी तयार केलेले मध, तिळाचे तेल व मध आणि तिळतेल मिश्रीत आयुर्वेदिक औषधांना १८० डिग्री उष्णतेखाली वस्तूंचे निर्जंतुकीकरण करून घेतले जाते. त्यानंतर हे औषध मुत्रमार्गाद्वारे आत सोडून मुत्र मार्गातील अडथळा दूर केला जातो.

मूत्रमार्गात दिली जाणारी उत्तरबस्ती :

मूत्रमार्गाद्वारे दिली जाणारी औषधीसुद्धा १८० डिग्री तापमाना खाली निर्जंतूक करून घेतल्यानंतर कॅथेटरच्या साहाय्याने हे औषध मूत्रमार्गात सोडले जाते. युरेथ्रल स्ट्रिक्चर (मूत्रनलिका संकोच) मात्र कॅथेटर न घालता ग्लास सिरिंजच्या साहाय्याने उत्तरबस्ती द्यावी लागते. यामुळे वारंवार येणारी लघवी, मुत्र मार्गातील अडथळे व बंद झालेली मुत्र नलिका मार्ग पुन्हा पूर्ववत होतो. त्यामुळे सारखी लघवी येणे बंद होते. शिवाय लघवी मार्ग बंद झालेला मार्ग पुन्हा सुरळीत होण्यास मदत होते.

कसा आहे आजार : एखाद्या रुग्णाचे मानसिक संतुलन बिघडल्यास त्याचे लघवी वरील संतुलन ढळते. त्यामुळे मूत्रप्रवृतीवर नियंत्रण नसणे, खोकताना-शिंकताना कळत न कळत सतत लघवी होणे, युरेथ्रल स्ट्रिक्चर (मूत्रनलिका संकोच) पुरुषामध्ये पौरुषग्रंथी वृद्धी (प्रोस्टेट ग्लॅड), अडखळत निर्माण झाल्यास मुत्र मार्ग बंद होतो. किंवा अतिप्रमाणात लघवी होते. यात स्त्री रुग्णांची संख्या ४० टक्के आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com