वाचा - हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्याने काय केले

Hingoli News
Hingoli News

हिंगोली : जिल्‍ह्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ४३० समूहांमार्फत शाश्वत शेती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या ८१९ लाभार्थीं एक हजार ५४० एकरांवर शाश्वत शेती करत आहेत. या शेतकऱ्यांनी रासायनिक खत न वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामीण भागातील वंचित घटकातील महिलांचे स्वयंसहायता समूह तयार करून त्यांच्याकडे असलेल्या नैसर्गिक साधनसामुग्रीचा उपयोग करून आर्थिक जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायत समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.

८१९ लाभार्थीं करताहेत शाश्वत शेती

त्याचाच एक भाग म्हणून हिंगोली व सेनगाव तालुक्यातील प्रत्येकी १३ गावांमध्ये शाश्वत शेती करण्याचे काम सुरू केले आहे. या अभियानामध्ये दोन तालुक्यांत २६ गावांत ४३० समूह तयार करण्यात आले आहेत. यामध्ये चार हजार ७४० सदस्यांचा गटामध्ये समावेश करण्यात आला आहे. ज्यांच्याकडे जमीन आहे अशा ८१९ लाभार्थींनी शाश्वत शेती करण्यासाठी सहभाग घेतला आहे.

औषधींचा वापर न करण्याचा निर्णय

या माध्यमातून सध्या एक हजार ५४० एकरांवर शाश्वत शेती करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये ७३१ सीड ट्रीटमेंट जिवामृत, ८७७ फेरोमन सापळे, २५७ बर्ड परचेस, ८४४ बॉर्डर क्राफ्ट, ५८१ दशपर्णी अर्क, १३५७ जिवामृत, १२५६ परसबाग ४३२ आदी नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून शेतीमध्ये वापर केला करण्यात येत आहे. शेतीवर होणाऱ्या रासायनिक खत, औषधींचा वापर शंभर टक्के न करण्याचे नियोजन या शेतकऱ्यांनी केले आहे.

तेलंगाणा राज्यातील तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन

दरम्यान, प्रकल्प संचालक धनवंतकुमार माळी यांनी भांडेगाव येथे नुकतीच भेट देऊन पाहणी केली. या वेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक जयराम मोडके, तालुका अभियान व्यवस्थापक राजू दांडगे उपस्थित होते. तेलंगाणा राज्यातील तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम सुरू केले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्री. पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजू दांडगे मार्गदर्शन करीत आहेत.

लाभार्थींनी शाश्वत शेतीसाठी घेतला सहभाग

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत २६ गावांत ४३० समूह तयार केले असून यामध्ये चार हजार ७४० सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. शेती असणाऱ्या ८१९ लाभार्थींनी शाश्वत शेतीसाठी सहभाग घेतला आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खते न वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
-जयराम मोडके, अभियान व्यवस्थाप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com