सिग्नल तुटले, पोलिसांनी वाहन थांबविले अन...

crime news
crime news

औरंगाबाद : सिग्नल तोडले अन..नियमांचा भंग केला म्हणुन पोलिसांनी कार चालकाला अडविले. सिग्नल तोडल्याचा जाब विचारुन तपासणी सुरु केली तेव्हा कारमध्ये चक्क बावीस हजारांचा विदेशी दारुसाठा सापडला. पोलिसांनी माल, कारसह चालकालाही ताब्यात घेतले. ही कारवाई तेरा नोव्हेंबरला सिद्धार्थ उद्यानाजवळील चौकात करण्यात आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मनीष खंडेलवाल असे संशयिताचे नाव आहे. पोलिस कॉन्स्टेबल सुमीत त्रिभुवन त्यांच्या सहकाऱ्यांसोबत वाहतुक नियमन करीत होते. त्यावेळी एक कार भरधाव वेगाने जात होती.

लाल दिवा लागुनही ती नियम मोडून पुढेच गेल्याने सुमीत त्रिभुवन यांनी कार अडविली. त्यानंतर चालकाची चौकशी केली. त्यानंतर कारमध्ये पाहणी केली त्यावेळी बडवायझर, व्हिस्की आदी 22 हजार 646 रुपयांची विदेशी मद्यसाठा सापडला. पोलिसांनी याबाबत चौकशी केली व मद्यसाठा जप्त केला. तसेच कारमधील मनीष खंडेलवालला कारसह ताब्यात घेतले. 

उस्मानपुरात घरफोडी

औरंगाबाद : उस्मानपुरा भागातील घरफोडून चोरांनी सहासष्ट हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना 12 नोव्हेंबरला मध्यरात्री घडली. याबाबत महिलेने तक्रार दिली. त्या देवदर्शनासाठी बाहेरगावी गेल्या होत्या. बारा ते तेरा नोव्हेंबरदरम्यान त्यांच्या घराचा कुलुप-कोंडा तोडून चोरांनी आत प्रवेश केला. त्यानंतर सोन्याचे दागिने रोख रक्कम व एटीएम कार्ड असा सहासष्ट हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

शहरातून तीन दुचाकी लंपास 

औरंगाबाद : शहरातील राधास्वामी कॉलनी, पानदरीबा व हडको येथील शॉपींग सेंटरजवळुन चोरांनी तीन दुचाकी लंपास केल्या. या घटना दहाव बारा नोव्हेंबरला घडल्या. 

अविनाश नारायण राठोड (वय 21, रा. राधास्वामी कॉलनी) यांची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना बारा नोव्हेंबरला रात्री साडेनऊनंतर घडली. त्यांच्या तक्रारीनुसार हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. राहुल शरद शहा (रा. पानदरीबा) यांची दुचाकी चोरी झाली. ही घटना दहा नोव्हेंबरला मध्यरात्रीनंतर जागृत हनुमान मंदीराजवळ, पानदरीबा येथे घडली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

स्वप्निल मधुकर म्हस्के (रा. टिव्हीसेंटर, हडको) यांची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना दहा नोव्हेंबरला सकाळी साडेअकरानंतर नेताजी सुभाषचंद्र बोसनगर येथील शॉपिंग सेंटरजवळ घडली. याबाबत म्हस्के यांच्या तक्रारीनुसार सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

दोन वाहनांचा अपघात 

औरंगाबाद : गोपाल टी चौकात दोन वाहनांचा अपघात झाला. ही घटना 14 नोव्हेंबरला घडली. याबाबत अजय रामकुमार श्रीवास्तव (रा. शहानुरवाडी) यांनी तक्रार दिली. ते दुचाकीने गोपाल टी मार्गे शहानुरवाडी दर्गाकडे जात होते. वळण घेताना विश्‍वनाथ गोडबोले यांचे वाहन (क्रमांक एमएच 20 एफजी 4441) ची धडक बसली. यात श्रीवास्तव यांच्या चारचाकीच्या दाराचे नुकसान झाले. अशा तक्रारीनुसार या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

कट मारल्यावरुन तिघांची तरुणाला मारहाण 

औरंगाबाद : वाहनाचा कट मारल्यावरुन दुचाकीस्वार तिघांनी रिक्षात बसलेल्या तरुणाला मारहाण केली. ही घटना तेरा नोव्हेंबरला रात्री सव्वा आठच्या सुमारास जळगाव रस्त्यावरील पेट्रोलपंपाजवळ घडली. सय्यद समीर सय्यद शौकत (वय 22, रा. बायजीपुरा) याने तक्रार दिली. तो नातेवाईकांना भेटण्यासाठी रिक्षात बसून जात होता. त्यावेळी जळगाव रस्त्यावर दुचाकीस्वारांनी कट मारल्यावरुन सय्यद समीर याला मारहाण केली. तसेच चांबडी पट्ट्याने मारहाण केली. अशा तक्रारीनुसार सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

किराणा दुकान फोडले 

औरंगाबाद : संभाजी कॉलनी येथील किराणा दुकान फोडून चोराने 34 हजार पाचशे रुपयांचा माल लंपास केला. ही घटना तेरा नोव्हेंबरला रात्री दहानंतर घडली. याबाबत विनोद भास्करराव जाधव (रा. संभाजी कॉलनी) यांनी तक्रार दिली. त्यांचे न्यु शंकर प्रोव्हीजन किराणा दुकान आहे. दुकानचे शटर उचकटून चोरांनी आत प्रवेश केला. त्यानंतर गहु कट्टे, चवळी, बदाम, साबन आदी 34 हजार पाचशे रुपयांचा किराणा माल चोरी केला. या प्रकरणी जाधव यांच्या तक्रारीनुसार, सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

महिलेचा विनयभंग 

औरंगाबाद : बाळासोबत झोपलेल्या महिलेशी अश्‍लिल वर्तन करुन एकाने विनयभंग केल्याचा प्रकार 14 नोव्हेंबरला जवाहरनगर भागात घडला. तेवीस वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, सुधाकर गंगाराम डुंडीयार असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com