
Walmik Karad Controversy: बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील युवा सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण व निर्घृण खून प्रकरणाने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडवली आहे. ९ डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास संतोष देशमुख यांना त्यांच्या चुलत भावासोबत कारमधून जात असताना, एका स्कॉर्पिओ गाडीतील सहा जणांनी अडवून जबरदस्तीने पळवून नेले. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळला. देशमुख यांच्या मृतदेहावर गंभीर मारहाणीच्या खुणा असल्याने प्रकरण आणखी गंभीर बनले.