- धनंजय शेटे
भूम - धाराशिव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटच्या जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी ३० जून रोजी राजीनामा दिल्याने धाराशिव जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील काही महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व कार्यकर्त्यांना निधी दिला नसल्याच्या कारणाने जिल्हाध्यक्ष धुरगुडे यांनी राजीनामा दिला असल्याचे चर्चिले जात होते. मात्र त्यांनी मला दोन वर्ष पूर्ण झाले असून नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी, यासाठी मी राजीनामा दिला असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.