
बीड - राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले आणि पहिल्या टप्प्यात त्यांच्यासह एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथा घेतल्या. संभाव्य मंत्रीमंडळ विस्तार पुढच्या आठवड्यात ११ तारखेला होण्याची शक्यता असून जिल्ह्यातून मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.