All Party Mega Meeting for water
sakal
कळंब - पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळवावे आणि धाराशिव, बीड व लातूर जिल्ह्यांच्या हक्काचा पाणीवाटपातील हिस्सा निश्चित करावा, या मागणीसाठी मांजरा धरण,धनेगाव कॅम्प येथे आमदार कैलास पाटील यांच्याकडून आयोजित सर्वपक्षीय महाबैठकीत उपस्थित राहून मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर ठाम भूमिका मांडण्यात आली. वर्षानुवर्षे बैठका,सर्वेक्षणे आणि आश्वासनांचे गुऱ्हाळ सुरू असताना प्रत्यक्षात मराठवाड्याच्या वाट्याला पाणी कधी येणार, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.