Santosh Deshmukh Case : लहान गोष्टीसाठी जिवावर का उठता? विष्णू चाटे धमकावत असताना संतोष देशमुख यांची विनवणी
Beed Crime : बीडमध्ये हत्या होण्याच्या आदल्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांनी विष्णू चाटे याच्याशी तणावपूर्ण संभाषण केले होते. "एवढ्या लहान गोष्टीसाठी जिवावर का उठता?" अशी विनवणी त्यांनी केली होती.
बीड : भाऊ एवढं काही झालं नाही. कशाला एवढं ताणता भाऊ, एवढ्या लहान गोष्टीसाठी जिवावर का उठता? अशी विनवणी हत्येच्या आदल्या दिवशी सरपंच संतोष देशमुख विष्णू चाटेला करीत होते.