स्कूल बसचा रंग ‘पिवळा’ च का?

नवनाथ येवले
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

0- मंद प्रकाशातही स्कूल बस सहज ओळखता येते
0- सहज दृष्टीस पडणारा रंग आहे
0- पिवळा रंगही तरंगलांबी आकर्षक 
0- मनुष्याची परिघीय दृष्टी 

नांदेड : स्कूल बसचा रंग पिवळाच का? असा अनेकांना प्रश्न पडतो. पिवळा हा केवळ पिवळा रंग नाही तर त्यामध्ये नारंगी रंगाचे मिश्रण आहे. शाळेच्या बसचा रंग हा नारिंगी आणि पिवळा मिळून तयार होतो. जो की आंब्याच्या रंगासारखा दिसतो. शेकडो वाहनांच्या रांगेत स्कूल बस ओळखणे सहज आहे ते बसच्या पिवळ्या रंगामुळे. 

पिवळा रंग आकर्षक आणि तेवढाचा डोळ्यात टिपणारा रंग आहे. अंधारातही सहज नजरेस पडणाऱ्या पिवळ्या रंगाच्या फुलांचा गंध शोषण्यासाठी ज्या तुलनेत फुलपाखरे, भुंगे आकर्षित होतात. त्या तुलनेत इतर फुलांवर त्यांचे प्रमाण कमी असते. पिवळा रंग इतर रंगाच्या तुलनेत सहज दृष्टीस पडणारा रंग आहे. त्यामुळे पहाटेच्या मंद प्रकाशातही स्कूल बस सहज ओळखता येते. या शिवाय दूर रस्त्यावरुन येणाऱ्या स्कूल बसकडे लक्ष नसले तरी आपली दृष्टी त्या बसवर काही क्षण स्थिरावते.  

स्कूल बसचा रंग पिवळाच का ?

जर आपण या मागील शास्त्रीय कारण शोधलं तर असे दिसून येते की, लाल रंग हा सर्वात जास्त तरंगलांबी असलेला रंग आहे (जवळपास ६५० एन.एम.) जो प्रकाशामध्येही दुरून सहजपणे दिसून येतो. सर्वसामान्यपणे लाल रंग हा सावधानतेचा द्योतक आहे. लाल रंग जसा तरंगलांबी आहे तसाच पिवळा रंगही तरंगलांबी आकर्षक आहे. त्यामुळेच तर शाळेच्या बसचा रंग हा पिवळा ठरविण्यात आला असावा 

पिवळ्या रंगाचे विशिष्ट स्वरूप 

स्कूल बसचा रंग पिवळा यासाठी असतो की, पिवळा रंग हा आपल्या डोळ्यांना सहज दिसणारा दृश्यमान रंग आहे. विविध रंगामधूनही तो आपल्या डोळ्यांना सहज दिसून येतो.

मंद प्रकाशाच्या वेळेस सुद्धा अनुकुल

पिवळा रंग हा असा रंग आहे जो प्रखर प्रकाशामध्ये आणि मंद प्रकाशामध्ये सहज उठून दिसतो आणि नजरेस येतो. बऱ्याच स्कूलच्या बस विद्यार्थ्यांना घेण्यासाठी पहाटे लवकर निघतात. ज्यावेळेस मंद प्रकाश असतो. अशा वेळेस हा रंग सहज उठून दिसतो.

मनुष्याची परिघीय दृष्टी 

स्कूल बस पिवळ्या असण्यामागे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे पिवळा रंग हा आपल्या डोळ्यांना लाल रंगापेक्षा १.२४ पटीने सर्वात लवकर आकर्षित करतो. म्हणजेच आपल्या डोळ्यांना १.२४ पटीने पिवळा रंग हा इतर रंगाच्या तुलनेत सहज दृष्टीस पडतो मग आपली दृष्टी सरळ बसच्या दिशेने नसेल तरी तो आपणास आकर्षित करतो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why is the color of the school bus 'yellow'?