सेंद्रीय भाजीपाला का असतो आरोग्यासाठी उपयुक्त

NND03KJP01.jpg
NND03KJP01.jpg

नांदेड : भाजीपाला तसेच धान्यावर रासायनिक खते व कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे शारिरीक व्याधी जडत आहेत. कॅन्सरसारखे आजारही यामुळे होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रीय पद्धतीने विषमुक्त भाजीपाल्याची लागवड केल्यास अधीक दरही मिळेल तसेच नागरीकांनाही आरोग्यासाठी उपयुक्त असलेला विषमुक्त भाजीपाला मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले.

मालपाणी शाळेसमोर दर रविवारी भरणार बाजार
शहरातील मगनपुरा भागात मालपाणी मुकबधीर शाळेसमोर रविवारी (ता. दोन) मालेगाव (ता. अर्धापूर) येथील विठोबा नैसर्गिक भाजीपाला व शेतमाल विक्री केंद्र उदघाटन श्री चलवदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. विक्रीकर अधीक्षक एकनाथ पावडे, कंधारचे तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, के-फॅर्ट लॅबचे बी. बी. पेंढकर, ओमशांती केंद्राच्या स्वाती बेहेनजी, भगवान इंगोले, संदीप डाकुलगे, आदी उपस्थित होते.

आरोग्यास नसतो धोका
रविशंकर चलवदे यांनी फवारणी केलेला भाजीपाला लगेच बाजारात लानला जातो. त्याच्या सेवनामुळे आरोग्यावर दुष्परीनाम होत असल्याचे सांगीतले. नैसर्गिकरित्या पिकवले व शेंद्रिय, जैविक भाजीपाला उत्पादन घेताना सुरवातीला कमी उत्पादन मिळते. त्यामुळे खरेदीदाराने थोडं महाग का असेना पण तो नैसर्गिक पद्धतीने पिकवला असल्याने आरोग्यास कुठल्याही धोका निर्माण होत नाही. त्यामुळेच दोन पैसे जास्त दिले तरी चालतील असे म्हणाले. 

शेतकरी गटाचा प्रयोग
शेतकरी एकत्र येऊन आपल्या शहरात विषमुक्त भाजीपाला विक्री करत आहेत. आपण त्यांच्या शेतीवर जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेतल्याच एकनाथ पावडे यांनी सांगीतले. यानंतर शेतकऱ्यांना एकत्र आणून विठोबा नैसर्गिक भाजीपाला विक्री करण्यात यावा, अशा सूचना केल्या. शेतकरी गट तयार करून त्याची सुरवात करण्याचा योग आला. बिजमाता राहीबाइ पोपरे या शेतकरी महिलेला केंद्र सरकारने पद्श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी देशी वानाची बँक तयार करून ती जोपासली. ते शात्रज्ञांना जमलं नाही, त्यांनी केल असे ते म्हणाले. कुठल्याही परिस्थितीत हार न मानता नैसर्गिक, जैविक शेती करून विषमुक्त उत्पादन घ्यावे. यातुन निरोगी भारत अभियान राबविण्यात मोलाचं काम होत आहे. संदीप डाकूलगे प्रास्ताविक तर भगवान इंगोले यांनी सुत्रसंचालन केले.

हातोहात भाजीपाला विक्री
मगनपुरा भागात विठोबा नैसर्गिक भाजीपाला व शेतमाल विक्री केंद्राच्या उद््घाटनानंतर विक्रीसाठी आनलेला भाजीपाला व फळांची हातोहात विक्री झाली. यात मेथी, कोथींबीर, आवरा, कारले, वांगी, गवार, टोमॅटो, मुळा, फुलकोबी, पानकोबी यासह मोसंबी, पेरु, लिंबु, बोर या फळांचा समावेश होता. दर रविवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत मगनपुरा भागातील मालपानी मुकबधीर विद्यालयासमोर हे विक्री केंद्र सुरु राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com