Dnyaneshwari Munde: पोलिस अधीक्षक कार्यालयाबाहेर विषप्राशन; ज्ञानेश्वरी मुंडेंविरोधात गुन्हा दाखल
Beed News: परळीतील हत्या प्रकरणातील आरोपी न पकडल्याने ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एसपी कार्यालयाबाहेर विष घेतले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बीड : आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर शुक्रवारी गुन्हा नोंद झाला. तीन दिवसांपूर्वी त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातून बाहेर पडताना विष घेतले होते.