आड वाटेने येणार का? धर्माबादेत कोरोना !

dhrmabad rasta.jpg
dhrmabad rasta.jpg


धर्माबाद, (जि. नांदेड) ः परजिल्ह्यात येण्याचे प्रतिबंध असताना आड मार्गाने अनेकांची पावले धर्माबाद तालुक्यात शिरकाव करीत आहेत. त्यामुळे धर्माबाद सीमेलगतच्या तेलंगणात उफाळत असलेला कोरोना विषाणू धर्माबादेत प्रवेश तर करणार नाही ना, ही भीती धर्माबादकर व्यक्त करीत आहेत.


कोरोनावर मात करण्यासाठी शासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. लॉकडाउनमुळे सर्वजण घरीच थांबले आहेत. काही व्यवसाय जागीच अडकले आहेत. पण लोक लॉकडाउनला न घाबरता छोटे व्यावसायिक बाहेर पडत आहेत. एवढ्यावरच न थांबता काही नागरिक चोर वाटेने तेलंगणातून महाराष्ट्रात प्रवेश करीत आहेत. धर्माबाद, बन्नाळी, बेल्लूर, नायगाव ही गावे तेलंगणा, महाराष्ट्र राज्य सीमेवर आहेत. छोटे व्यावसायिक, शेतकरी, नागरिक या आड मार्गाच्या गावावरून सहजतेने धर्माबादेत प्रवेश करीत आहेत. 

सध्या लॉकडाउन आहे, पोलिस विभागाने मुख्य मार्गाची सीमाबंदी केली आहे. सीमा बंदस्थानी चोवीस तास पोलिस विभाग तैनात आहेत. परराज्यातील लोक दुसऱ्या राज्यात जाऊ नयेत यासाठी सीमा बंद केल्या आहेत. तेलंगणातील लोक येळवत, वाडवना या मार्गे धर्माबादेत येत आहेत. काही नागरिक कॉलेजच्या पाठीमागून पाऊल वाटेने येत आहेत. तानूर परिसरातील नागरिक तर वाणीजवळा, तोंडाळा मार्गे येवती, येताळा तसेच वडगाव, हासनाळी या गावच्या पाऊल वाटेने धर्माबाद तालुक्यात तेलंगणातील नागरिक ये-जा करीत आहेत. तेलंगणातील निजामाबाद, म्हैसा, कंदाकुर्तीसह आतातर तानूर या गावात कोरोना विषाणूची लागण झालेले नागरिक आहेत. तर अनेक संशयित रुग्ण आढळून आली आहेत. यामुळे तेलंगणा धोक्याच्या स्थितीत आहे. अशा वेळी तेलंगणातून लोक धर्माबादेत ये - जा करीत असल्याने धर्माबादकरांमध्ये कोरोना या आड मार्गाने येणार तर नाही ना, ही भीती सतावत आहे. धर्माबाद तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे एकही रुग्ण नाहीत. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.

धर्माबादहून कोरोनाचे अंतर अवघे १२ किमी
धर्माबाद तालुक्यासह जिल्ह्यात कोरोनाचा अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्हा व तालुका प्रशासनाने खबरदारी घेत लॉकडाउन व संचारबंदी उत्तम रीतीने हाताळत असल्याचे निदर्शनास येते आहे. तालुका प्रशासन वेळोवेळी उपाययोजना राबवित असल्याने तालुक्यातील नागरिकांसाठी उपयोगाचे ठरत आहे. ग्रामीण भागातील संचारबंदी एकदम कडक नसली तरी परिस्थिती हाताबाहेर गेली म्हणता येणार नाही. असे असले तरी आपल्याला सावधान राहावे लागणार आहे. धर्माबादच्या सीमेलगत असलेले तेलंगणातील तानूर हे केवळ १२ किमी अंतरावर आहे. यासोबतच कंदाकुर्ती सीमेवर आहे. तर म्हैसा, निजामाबाद धर्माबादच्या ३० ते ४० किमी अंतरावर आहे. त्यामुळे तेलंगणातून कोरोनाचा धर्माबादेत कधीही शिरकाव होऊ शकतो. म्हणूनच प्रत्येकांनी खबरदारी आणि सावध राहणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com