Wind turbine cable theft
sakal
कळंब - येरमाळा, वाशी, तेरखेडा, इंदापूर व ढोकी परिसरातील पवनचक्कीच्या नवीन विद्युतवाहिन्यांवरील अॅल्युमिनियमच्या तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. मांडवा शिवारात चोरीच्या तारांचे बंडल पिकअपमध्ये भरताना पाच जणांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.त्यांच्याकडून चोरीच्या तांब्या-अॅल्युमिनियमच्या तारा, पिकअप व दोन मोटारसायकली असा तब्बल ११ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.