Windmill Fire: लोहारा तालुक्यात पवनचक्कीला भीषण आग; महिला मजुरांचा जीव वाचवण्यासाठी शेतातून पलायन, सोयाबीन पिकाचे नुकसान

हिप्परगा शिवारातील खासगी पवनचक्कीला अचानक लागलेल्या आगीत वरच्या नॅसेलमधून ज्वाळा उसळल्या; महिला मजुरांनी शेतातून पळ काढत जीव वाचवला, तर जळालेल्या तुकड्यांमुळे सोयाबीन पिकाचे नुकसान
The incident also caused damage to a soybean crop, while the exact cause of the fire will be determined after a technical inspection.

The incident also caused damage to a soybean crop, while the exact cause of the fire will be determined after a technical inspection.

Sakal

Updated on

लोहारा (जि. धाराशिव): लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) शिवारातील शेतकरी देवानंद वसंत शिवकर यांच्या शेतात उभारण्यात आलेल्या खासगी कंपनीच्या पवनचक्कीला गुरुवारी (ता. २३) सायंकाळी साडेच्यारच्या सुमारास अचानक आग लागली. पवनचक्कीच्या वरच्या नॅसेल (यंत्रसामग्री असलेल्या भागातून) आगीच्या ज्वाळा उसळू लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीमुळे काळ्या धुराचे मोठे लोट आकाशात पसरल्याने ही घटना दूरवरूनही दिसून येत होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com