सर्वांच्या सहकार्याने मला न्याय व्यवस्थेबाबत चांगले काम करता आले- न्यायाधीश डी. एस. पारवानी

येथील न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश डी. एस. पारवानी कळमनुरी न्यायालयाअंतर्गत कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथील न्यायालयात बदली झाली आहे.
न्यायधीश पारवानी
न्यायधीश पारवानी

कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : कळमनुरी न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. पारवाणी यांनी आपल्या कार्यकाळात तरुण विधीज्ञांना न्यायालयासमोर युक्तिवाद करण्यासाठी दिलेले प्रोत्साहन व न्यायालय परिसरात त्यांनी जोपासलेले वृक्ष प्रेम, पशुपक्ष्यांसाठी स्व: खर्चातून पिण्याचे पाणी व खाण्याच्या केलेल्या व्यवस्थेच्या आठवणींना वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निरोप समारंभामध्ये उजाळा दिला. विशेष म्हणजे न्यायाधीश पारवानी हे दरमहा एक ते दीड क्विटंल धान्य ज्यात ( तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी ) पक्षांसाठी स्व: खर्चाने आणत असत.

येथील न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश डी. एस. पारवानी कळमनुरी न्यायालयाअंतर्गत कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथील न्यायालयात बदली झाली आहे. कळमनुरी वकील संघाच्या वतीने गुरुवार (ता. 27) ला न्यायाधीश श्री पारवानी यांचा सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी वकील संघाचे पदाधिकारी अॅड. सुनील घोंगडे, अॅड. विवेक दैठणकर, अॅड. इस्माईल अश्रफी, अॅड. रवी शिंदे, सरकारी अभियोक्ता श्रीमती माहुरे, अॅड. अजहरुद्दिन कादरी, अॅड. म. इकबाल, अॅड. एल. एल. शिरसाट, अॅड. अमोल डिग्गीकर, अॅड. डी. पी. जाधव, अॅड. शाकीर सिद्दिकी, अॅड. सतीश पंडित, अॅड. विश्वनाथ चौधरी, अॅड. इलियास नाईक, अॅड. जे. आर. जाधव, अॅड. व्ही. टी. माखणे, अॅड. एस. आर. जाधव, अॅड. अमोल पतंगे, अॅड. श्री मुठाळ, अॅड. डी. एस. पाईकराव, अॅड. अविनाश काळे, अॅड. सय्यद जामकर, अॅड. श्रीमती काळे, अॅड. एस. टी. नरवाड, अॅड. के. पी. जोंधळे, अॅड. यश मुठाळ यांची यावेळी उपस्थिती होती. वकील संघाच्या वतीने न्यायाधीश श्री पारवानी यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा - जगणे यापुढेही नव्याने उगवत राहिल- मनोज बोरगावकर

यावेळी बोलताना श्री पारवानी पुढे म्हणाले की, कळमनुरी येथे सर्वांच्या सहकार्याने मला न्याय व्यवस्थेबाबत चांगले काम करता आले. नागरिकांमध्येही न्याय व्यवस्थेबाबत व कायदे विषयक समाज जागृती करण्याकरिता वकील मंडळींनी पुढाकार घेत माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी त्यांनी मांडले.

वकील संघाच्या सदस्य अॅड. विश्वनाथ चौधरी, अॅड. एल. एल. सिरसाट, अॅड. रवी शिंदे, अॅड. विवेक दैठणकर, अॅड. म. एकबाल यांनी न्यायाधीश श्री पारवानी यांनी आपल्या मनोगतात न्यायाधीश पारवानी यांनी तरुण विधिज्ञांना न्यायालयासमोर युक्तिवाद करण्यासाठी दिलेले प्रोत्साहन दिले. तसेच न्यायालय परिसरात करण्यात आलेले व जतन केलेले वृक्षारोपण, न्यायालय परिसरातील चिमण्या, पोपट,कबूतर इतर पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व खाण्याची नियमितपणे स्वखर्चातून केलेली व्यवस्था व व घेतलेली काळजी या बाबीचा आवर्जून उल्लेख करुन त्यांच्याकडून घेण्यात आलेल्या या पर्यावरणपूरक आठवणींना या निरोप समारंभामध्ये उजाळा दिला.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com