
निलंगा : निलंगा ते उदगीर ही जनता बसगाडी उदगीर वरून निलंग्याकडे येत असताना झरी ता. निलंगा येथील थांब्यावर थांबली असता वाचकांकडून पायऱ्या वर थांबू नका..खाली पडणाल म्हणून बोलत असताना त्याच गावातील सुधाकर व्यंकटराव पाटील यांनी पडलो तर तु जबाबदार असशील म्हणत हुज्जत घालत महीला वाहकास चापटा मारत डोक्यात व हाताला मार देत जातीवाचक शिवीगाळ केली हा प्रकार शनिवारी ता. २३ रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडला. सध्या चक्कर येत असल्याने संबंधित महीला वाहकाला निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.