बेशुद्धावस्थेत सापडलेल्या महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

र्काबाद खराडी (ता. गंगापूर) येथील शेतात कामासाठी गेलेली महिला बेशुद्धावस्थेत सापडल्यानंतर उपचारादरम्यान रविवारी (ता.25) या महिलेचा मृत्यू झाला. स्वतःच्या शेतात शुक्रवारी (ता. 16) दुपारी महिला बेशुद्धावस्थेत सापडली होती. या महिलेवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी सकाळी या महिलेचे निधन झाले.

लिंबेजळगाव, ता. 25 (जि.औरंगाबाद) : तुर्काबाद खराडी (ता. गंगापूर) येथील शेतात कामासाठी गेलेली महिला बेशुद्धावस्थेत सापडल्यानंतर उपचारादरम्यान रविवारी (ता.25) या महिलेचा मृत्यू झाला. स्वतःच्या शेतात शुक्रवारी (ता. 16) दुपारी महिला बेशुद्धावस्थेत सापडली होती. या महिलेवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी सकाळी या महिलेचे निधन झाले.

शीला दादासाहेब चोरमारे (वय 22) ही विवाहिता शेतात कामासाठी गेली होती. त्या ठिकाणी ती अचानक बेशुद्ध झाल्याची माहिती मिळताच पती दादासाहेब चोरमारे यांनी उपचारासाठी पत्नीला औरंगाबादच्या घाटी दवाखान्यात दाखल केले. उपचार सुरू असताना शीला चोरमारे या महिलेचा मृत्यू झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman Died While Treatment