धक्कादायक...! कपडे वाळवताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

file photo
file photo

पाथरी (जि.परभणी) : कपडे वाळत घालण्याच्या तारेत वीजपुरवठा उतरल्याने एका विवाहितेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तर तिला वाचविण्यासाठी आलेल्या दोन महिला जखमी झाल्या. ही घटना बंदरवाडा (ता.पाथरी) येथे मंगळवारी (ता. चार) सायंकाळी पाच वाजता घडली.

बांदरवाडा येथील भागवत नखाते यांची पत्नी प्रियंका नखाते (वय २४) या नेहमीप्रमाणे अंगणातील तारेवर धुणे वाळत घालत असताना त्या तारेला चिकटल्या. त्या ओरडत असताना शेजारच्या जनाबाई गणपतराव गायकवाड ( वय ६५) व येनुबाई बाबासाहेब गायकवाड (वय ७०) या प्रियांका यांना वाचविण्यासाठी आल्या. परंतु, त्या दोघीही प्रियंका यांना ओढण्यासाठी पकडले असता त्याही चिकटल्या गेल्या. तिघींच्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्या ठिकाणी असणाऱ्या बांधकाम मजुराने लाकडाच्या सहाय्याने त्यांना त्या तारेपासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. 

बांदरवाडा गावावर शोककळा
यात जनाबाई गायकवाड व येनुबाई गायकवाड या बाजूला फेकल्या गेल्याने वाचल्या, तर प्रियांका या तारेला चिकटून राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला. जखमी महिलांवर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. प्रियंका नखाते यांना चार वर्षांचा मुलगा असून त्यांचे माहेर व सासर बंदरवाडा होते. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. घटनेचा तपास राऊत हे करीत आहेत.

हेही वाचा ...

गंगाखेड येथे मृतदेह आढळला
गंगाखेड (जि.परभणी) : गंगाखेड -परभणी मार्गावरील खळी पुलाखाली कुजलेल्या अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी (ता. चार) सकाळी ११ वाजता सापडला. दरम्यान, या मृतदेहाची ओळख पटण्यासाठी फोटो दुसलगावच्या पोलिस पाटील संगीता कचरे यांनी व्हाॅट्स ॲप ग्रुपवर टाकला. फोटो व्हायरल झाल्यानंतर अनोळखी व्यक्ती शेळगाव (ता. सोनपेठ) येथील असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद गंगाखेड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

सदरील व्यक्ती शेळगावचा
खळी शिवारातील गोदावरी पुलाखाली कुजलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. कुजल्यामुळे या मृतदेहाची दुर्गंधी येत होती. मार्गावरील नागरिकांनी दुसलगावचे पोलिस पाटील संगीता कचरे यांच्या मदतीने कृष्णा बिजले व श्रीनिवास कचरे यांनी मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून ओळख पटण्यासाठी फोटो पोलिस पाटील कचरे यांनी व्हाॅट्स ॲप ग्रुपवर टाकला. शेळगावच्या पोलिस पाटील यांनी सदरील व्यक्ती शेळगावचा असल्याचे सांगितले आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com