esakal | पावसामुळे कर्ज फेडायचं कसं या चिंतेतून शेतकरी महिलेची आत्महत्या | Farmer Suicide In Jalna
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी महिला यमुना भोकरे

पावसामुळे कर्ज फेडायचं कसं या चिंतेतून शेतकरी महिलेची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राहुल मुजमुले | सकाळ वृत्तसेवा

परतूर (जि.जालना) : सततची नापिकी, डोक्यावर सरकारी व खासगी कर्जाचा डोंगर, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न, मतिमंद मिळाला लागणारा खर्च पेलवत नसल्याने शेतामधील झाडाला गळफास घेऊन महिला शेतकरीने आत्महत्या (Woman Farmer Suicide) केल्याची घटना शनिवारी (ता.दोन) सकाळी आठ वाजता तालुक्यातील दैठणा बु. येथे घडली. यमुनाबाई लिंबाजी भोकरे (वय 45) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी महिलेचे नाव आहे. त्याचे पती लिबाजी भोकरे यांच्यावर परतूर (Partur) येथील बॅंकेसह इतर कर्ज असल्याने ते सतत पडत असलेल्या पावसामुळे (Jalna) कर्ज फेडायचं कस नैराश्यातुन त्यांनी शनिवारी सकाळी शेतामध्ये झाडाला दोर बांधून गळफास घेतला. नेहमीप्रमाणे त्या शेतीमध्ये सकाळी जाऊन येतात. परंतु शनिवारी त्यांना उशीर झाल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेतला.

शेतात पाहिले असता त्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्या. याबाबत माहिती आष्टी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. या प्रकरणी लिंबाजी भोकरे याच्या फिर्यादीवरून बँक कर्जाच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचे कुटुंबातील सदस्यांनी पंचनाम्यात नमूद केले. शवविच्छेदन आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रावर करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, सून, नातवंड असा परिवार आहे.

शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे योग्य नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्याच पाऊल उचलणे योग्य नाही असे पाऊल उचल्याने कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. दिवस आज न उद्या बदलत असतात संयम ठेवणे महत्त्वाचे आहे.

शत्रुघ्न कणसे, सरपंच,दैठणा बुद्रुक

loading image
go to top