Beed Crime: हुंड्यासाठी उपाशी ठेवून विवाहितेचा छळ;पतीसह सहा जणांविरोधात शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल
Crime News: बीड येथील पंडितनगर भागात विवाहितेला हुंड्यासाठी उपाशी ठेवून छळ केल्याची घटना घडली आहे. पतीसह सहा जणांविरोधात शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड : दोन मुले असलेल्या विवाहतेला हुंड्यासाठी उपाशी ठेवून छळ केल्याची फिर्याद महिलेने शिवाजी नगर पोलिस ठाण्यात दिली. शहरातील पंडितनगर भागात ही घटना घडली. पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.