भरधाव ट्रकचे चाक महिलेच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर, दुचाकी चालक ऋषिंद्र सखाराम बनकर हे किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातानंतर घटनास्थळावरून ट्रकचालक फरार झाला आहे.
जालना : जालना-राजूर रोडवर (Jalna-Rajur Road Accident) दुचाकीला ट्रकने आज सकाळी जोराची धडक दिली. या अपघातात महिला जागीच ठार (Woman Killed) झाली आहे. शशिकला सखाराम बनकर (वय 60, रा. देळगव्हाण) असे या महिलेचे नाव आहे.