esakal | HRCT स्कोअर २५, ऑक्सिज ४१ असूनही जिद्दीच्या बळावर कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

beed

HRCT स्कोअर २५, ऑक्सिज ४१ असूनही जिद्दीच्या बळावर कोरोनावर मात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-ईश्वर खामकर

किल्ले धारूर (बीड): सिटी स्कॅनमधील एचआरसीटी स्कोअर २५ आणि ऑक्सिजन लेव्हल केवळ ४१ वर खाली आली. नातेवाईकांचा धीर संपला. पण, डॉक्टरांचा विश्वास आणि रुग्णाची प्रबळ इच्छाशक्ती होती. म्हणून तब्बल ३२ दिवस झुंज देत हिरकनीने कोरोनाचा कडा उतरला. येथील मठगल्लीतील इंदूबाई रामचंद्र खामकर (वय ५२) यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सुरुवातीला घरीच उपचार केले. नंतर ११ मेला स्थानिक कोविड सेंटरमध्ये नेले. प्रकृती पुन्हा बिघडल्याने लोखंडीच्या कोविड रुग्णालयात दाखल केले. पण, ऑक्सिजन लेवल दिवसेंदिवस कमी होत होती. त्यामुळे त्यांना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले

खामकर यांचा सिटी स्कॅन केल्यानंतर एचआरसीटी स्कोअर २५ पैकी २५ आला. त्यांच्या फुफ्फुसावर १०० टक्के संसर्ग झाल्याने त्यांची ऑक्सीजन लेव्हल केवळ ४१ पर्यंत खाली आलेली होती. दोन्ही बाबी पाहून नातेवाईकांनी मात्र हात टेकले. पण, खरी शर्थ इथूनच सुरु झाली. कारण, रुग्ण आणि स्वारातीच्या टिमने हार मानली नव्हती. औषध वैद्यक शास्त्राचे (मेडिसीन) सहयोगी प्राध्यापक व वार्ड इन्चार्ज डॉ. सचिन चौधरी यांनी सुत्रे हाती घेतली आणि लाईन ऑफ ट्रिटमेंट निश्चीत केली.

हेही वाचा: महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचे लाखोंचे नुकसान

२५ मे ते दोन जून पर्यंत व्हेंटलेटरवर असलेल्या इंदूबाई १२ जुनला कोरोनावर मात करुन डिस्चार्ज झाल्या. डॉ. सचिन चौधरी यांच्या नेतृत्वाखालील फिजिशियन डॉ. भूषण जोगदंड, डॉ. अक्षय मूदूळकर, डॉ. सुमित कदम, डॉ. रोहिणी मुंडे, परिचारिका श्रीमती खरात आदींचे उपचाराचे कौशल्यही महत्वाची ठरली.

रुग्णाची कंडीशन क्रिटीकल होती. आमच्या प्रयत्न आणि वैद्यकीय उपचार कौशल्याइतकेच रुग्णाच्या इच्छाशक्तीलाही महत्व आहे. स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात अशा अनेक गंभीर रुग्णांवर यशस्वी उपचार झाले.

- डॉ. सचिन चौधरी, सहयोगी प्राध्यापक, औषध वैद्यक शास्त्र विभाग.

loading image