वडवळ नागनाथ - अवैद्य दारू विक्रीच्या विरोधात चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील संतप्त महिलांनी एल्गार पुकारला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिलांनी बुधवारी (ता.१४) चक्क दारू विक्रीचा स्टॉलच लावला.
यावेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अहो मुख्यमंत्री साहेब... तुमच्या लाडक्या बहिणीला अनुदान नको... आमच्या हक्काचे रोजंदारीचे तीनशे रुपये सुखाने खाऊ द्या... तुम्ही फक्त गावागावांत सुरू असलेली अवैद्य दारू विक्री बंद करा, अशी आर्त हाक येथील महिलांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे.