सायबर सुरक्षेसाठी ‘महिलांनी’ जागरुक रहावे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जानेवारी 2020

सायबर सुरक्षेसाठी महिला, बालक, विद्यार्थी तसेच नागरिकांनी जागरुक राहिले पाहिजे, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी केले.

नांदेड : महिला व बालकांवरील गुन्हे, अत्याचार, फसवणूक यासाठी समाजकंटक फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सायबर सुरक्षेसाठी महिला, बालक, विद्यार्थी तसेच नागरिकांनी जागरुक राहिले पाहिजे, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी केले.

कुसूमताई प्राथमिक, माध्यमिक व उच्च महाविद्यालय सिडको येथे जिल्हा पोलीस दल, कुसूमताई प्राथमिक माध्यमिक, उच्च महाविद्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बालकांसाठी जागरुकता मोहिम या विषयावर कार्यशाळा शुक्रवारी (ता. तिन) जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थावरुन श्री. राठोड बोलत होते.

हेही वाचा---Video : अशोक चव्हाणांचे नांदेडला जल्लोषात स्वागत

यांची होती उपस्थिती 
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मीरा ढास, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चिखलीकर द्वारकादास, दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक प्रणिता बाभळे, सायबर सेलचे राजेश आलीवार, सुरज गायकवाड, कुसूमताई प्राथमिक माध्यमिक व उच्च महाविद्यालयाचे कमलाकर जोशी, पर्यवेक्षक संजय चाटे, पत्रकार, विविध मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी- विद्यार्थींनी आदिंची उपस्थिती होती.

पोलीस प्रशासन प्रयत्नशील
अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. राठोड पुढे म्हणाले, माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटच्या माध्यमातून सायबर गुन्हे होत असून याची आपण अनेक उदाहरणेही पाहत आहोत. सायबर गुन्हे घडू नयेत म्हणून पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठी आपण सर्वांनी जागरुक असायला हवे. महिला व बालकांची सुरक्षितता, सायबर गुन्ह्याबाबत जाणीव जागृती होण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे, असे श्री. राठोड यांनी सांगितले.

येथे क्लीक करा---नांदेडमधील हा कक्ष बनलाय महिलांसाठी आधार

महिला हेल्पलाईन क्रमांक 
दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रणिता बाभळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. महिला हेल्पलाईन क्रमांक 1098 व 1091 चा वापर करुन या क्रमांकावर तक्रार केल्यानंतर तात्काळ प्रतिसाद देण्यात येतो असेही त्यांनी सांगितले.  

सायबर गुन्ह्यांना आळा
जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मीरा ढास म्हणाल्या, सायबर गुन्ह्यांना आळा घालण्याबरोबरच  महिलावरील अत्याचारास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी त्यांना प्रचलीत कायदाच्या संरक्षणाची जाणीव करुन देणे हा  या उपक्रमाचा मूळ हेतू आहे. त्यानुसार “सायबर सेफ वुमन” या शिर्षकाखाली जागरुकता मोहिम राबविण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Women' should be vigilant for cyber security