महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये - प्रियंका चतुर्वेदी

सिल्लोड ः शिवसेना महिला आघाडीतर्फे आयोजित "प्रथम ती' या महिला संमेलनात सहभागी शिवसेनेच्या कार्यकर्त्या.
सिल्लोड ः शिवसेना महिला आघाडीतर्फे आयोजित "प्रथम ती' या महिला संमेलनात सहभागी शिवसेनेच्या कार्यकर्त्या.

सिल्लोड  (जि.औरंगाबाद) ः "" शिवसेनेने नेहमीच महिला सबलीकरण, सक्षमीकरणावर भर दिला असून, आता महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहता कामा नये,'' असे आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या, प्रियंका चतुर्वेदी यांनी केले.
शिवसेना राज्य महिला आघाडीतर्फे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून "प्रथम ती ' हे महिला संमेलन मंगळवारी (ता. दहा) येथे घेण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या उपविभाग संघटक दीपा पाटील, मुंबईच्या प्रभाग समिती अध्यक्ष संध्या दोशी, मुंबईच्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, माजी नगरसेविका कामिनी शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.


संमेलनाच्या प्रवर्तक प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, ""आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगात कोणीही आपल्याला हरवू शकत नाही, असा उपदेश बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला आहे. यातून प्रेरणा घेऊन महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा. त्यांचे संरक्षण, सबलीकरण होऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील आधुनिक नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी महिलांचा मोलाचा सहभाग असावा. "प्रथम ती' महिला संमेलनातून जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, राज्यातील पहिले संमेलन सिल्लोड येथे होत आहे.''


यावेळी दीपप्रज्वलन, महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून संमेलनाचे उद्‌घाटन करण्यात आले. शिवसेनेचे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांचा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रघुनाथ चव्हाण, तालुका प्रमुख किशोर अग्रवाल आदींची उपस्थिती होती.
शिवसेनेमुळेच महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी असून, शिवसेनेमुळेच मुंबईत महिला सुरक्षित आहेत, असे तेजस्वी घोसाळकर यांनी सांगितले.


शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी 1985 मध्ये स्वस्त धान्य भाववाढीच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे सरकारने धान्याचे भाव स्थिर केले होते, याची आठवण दीपा पाटील यांनी करून दिली. नगराध्यक्षा राजश्री निकम यांनी प्रास्ताविक, दीपाली भवर यांनी सूत्रसंचालन केले. दुर्गाबाई पवार यांनी आभार मानले. संमेलनास शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख रेखाताई वैष्णव, जिल्हा परिषद सदस्या सीमा गव्हाणे, मीना गायकवाड, मंगलाताई तायडे, पंचायत समितीच्या माजी सभापती रेखा जगताप, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, कल्याणी गौर, सविता झंवर, शबाना बेगम, शेख बाबर, कडूबाई सपकाळ, हिराबाई क्षीरसागर, मालती डोभाळ, डॉ. कुंती झलवार, दीपाली बेंडाळे, अर्चना पवार, विद्या गव्हाणे आदी उपस्थित होते.
-----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com