Beed Crime: जुन्या वादातून महिलेची स्कूटी जाळली; मुलालाही मारहाण गजानन कॉलनीतील घटना, सहा जणांविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल
Beed News: बीडच्या कॅनॉल रोड परिसरात जुन्या वादातून एका महिलेला त्रास देण्याच्या उद्देशाने तिच्या स्कूटीसह इतर दुचाकी जाळण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी तिच्या मुलावर सशस्त्र हल्ला करण्यात आला, ज्यामुळे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.
बीड : शहरातील कॅनॉल रोड परिसरात जुन्या वादातून एका महिलेला त्रास देण्याच्या उद्देशाने तिची स्कूटी आणि इतर दुचाकी जाळण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या मुलावर सशस्त्र हल्ला करण्यात आला.